नवी मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्याच्या घरात नोकराचाच दरोडा

नवी मुंबई ०८ एप्रिल २०१८ : नवी मुंबई महानगरपालिका विरोधी पक्ष नेते शिवसेनेचे नगरसेवक विजय चौगुले यांच्या घरी नोकरानेच टाकला. काल संध्याकाळी घरात कुणीच नसल्याचा फायदा आरोपीने हातसफाई केली. १९ वर्षीय आरोपी अनुराग सिंग हा गेल्या पाच वर्षांपासून चौगुले यांच्याकडे कामाला होता. काल संध्याकाळी ७ ते रात्री पर्यंत घरात कोणीच नसल्याचा फायदा घेत आरोपी अनुरागने टाकून ९० तोळे सोने आणि अडीच लाख रोख रक्कम घेवून केला.एकूण ३० लाख किंमतीचा ऐवज आरोपीने लंपास केला खिडकीची ग्रील वाकवून बेडरूम मध्ये आरोपीने प्रथम प्रवेश यानंतर घरातील किंमती दागिने आणि पैसे लुटले. चोरी इमारतीमधून बाहेर पडताना आरोपी प्लास्टीक पिशवी हातात जात असल्याचे आढळले आहे. दरम्यान या प्रकरणी रबाले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस टीम रवाना झाली आहे.