मुंबई (प्रतिनिधी) ०८ एप्रिल २०१८ : भांडूप येथे क्षुल्लक कारणांवरुन चाकू, सुरीच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार झकोरिया कंपाऊंड, सोनापूर, भांडूप (प) मुंबई -७८ येथे टेम्पो व हातगाडी लावण्याच्या क्षल्लक कारणांवरून आरोपी कासीम कुरेशी व त्याचे इतर तीन साथीदार यांनी आपापसांत संगनमत करून गुलाम अली खान नावाचा इसम आणि त्याची दोन मुले शाहबाज खान आणि शादाब खान यांच्यावर चाकू आणि सुरीने प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारले अशी तक्रार फिर्यादीने भांडूप पोलीस ठाण्यात दिली असता त्याप्रमाणे या तक्रारीवरून भांडूप पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.नमूद गुन्ह्यातील चारही आरोपी गुन्हा करून पळून गेल्याने त्यांच्या शोधार्थ शोध पथक तयार करून सदर आरोपी हे मुंबई हद्द सोडून गेल्याची माहिती मिळाली असता या आरोपींचा विविध माध्यमातून शोध घेण्यात आला. त्यानुसार पूर्व दिल्ली येथून या गुन्ह्यातील आरोपी कासीम नत्थकरेशी वय - २५ वर्षे, आणि अजीम नत्थूकुरेशी वय- २२ वर्षे यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याबाबत त्यांची चौकशी केली असता. सदरचा गुन्हा इतर पाहिजे साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई अपर पो. आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग.लखनी गौतम, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ -७, अखिलेशकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, चेंबूर विभाग, मोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त भांडूप विभाग, सांडभोर, व.पो.नि भांडुप पो.ठाणे, पन्हाळे, पो.नि. तेंडुलकर/ भांडप, पो.नि. भोसले/ नवघर, पो.ठाणे, सपोनि पुरी/ मुलुंड पो.ठाणे., सपोनी कदम/ चेंबूर पो.ठाणे, सपोनि जाधव/ नवघर पो.ठाणे. सपोनि काळे, सपोनि भोई/ भांडूप पो.ठाणे. पोउपनि पवार, जाधव, आंबवणे / टिळकनगर पो.ठाणे, पो.ना.बरकले/ भांडूप पो.ठाणे पो.शि. बेंडकुळे/ नवघर पो. ठाणे तकीक/ टिळकनगर पो.ठाणे. मंडलिक/ चेंबूर पो.ठाणे, आणि इतर पथक यांनी अथक परिश्रम घेवून ते तिहेरी खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीतांना अटक करण्याची यशस्वी कामगिरी पार पाडलेली आहे.
क्षुल्लक कारणांवरून भांडण करून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी भांडूप येथे दोघांना अटक