मोनोरेलच्या उत्पन्नापेक्षा सुरक्षेवरचा खर्च जास्त

मुंबई : पुढील आर्थिक वर्षात मोने रेल प्रकल्पातील सुरक्षारक्षकांसाठी ५ कोटी ३५ लाख रुपये खर्च करावे लागणार असून, श्वान पथकांचा खर्चही १ कोटी ६९ लाखांवर जाणार आहे. मोनोला तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न जेमतेम ६ कोटीच आहे. सुरक्षा व्यवस्थेवर जेवढा खर्च होतो, तेवढेही उत्पन्न मोनोला कमावता येत नाही, हे यातून अधोरेखित होते. धक्कादायक बाब म्हणजे, तिकीट वाटप व्यवस्थेवर ३ कोटी ७५ लाख रुपये खर्च होत असून, तो तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ६१ टक्के आहे.